-
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी मालिकेतील कलाकारांनी मिळून कौमुदी वलोकरचं केळवण केलं होतं.
-
यानंतर अभिनेत्रीच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होऊन ग्रहमख सोहळा पार पडला होता.
-
आता कौमुदीच्या हातावर मेहंदी रंगली आहे.
-
कौमुदीच्या मेहंदी सोहळ्याला सुद्धा तिचे जवळचे मित्रमंडळी, मालिकाविश्वातील कलाकार उपस्थित होते.
-
कौमुदीने मेहंदीसाठी पांढऱ्या रंगाचा धोती ड्रेस घालून हटके लूक केला होता. या ड्रेसवर रंगीबेरंगी वर्क करण्यात आलं होतं.
-
कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे असं आहे. त्याने देखील बायकोसाठी सुंदर अशी मेहंदी आपल्या हातावर काढून घेतली आहे.
-
आकाश हा उच्चशिक्षित असून त्याने एज्युकेशन विषयात आपली पीएचडी पूर्ण केलेली आहे. तो ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. त्याने वेबसाइटवर अनेक ब्लॉग्ज देखील लिहिले आहेत.
-
आता लवकरच कौमुदी आणि आकाश विवाहबंधनात अडकणार आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : कौमुदी वलोकर, theroyalweddings इन्स्टाग्राम )

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य