-
‘नवरी मिळे हिटलरला’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात.
-
एजे व लीला ही प्रेक्षकांची लाडकी पात्रे असून त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसते.
-
एजे हे पात्र अभिनेता राकेश बापट तर लीला हे पात्र अभिनेत्री वल्लरी विराजने साकारले आहे.
-
कलाकारांच्या मालिकेतील पात्रांबरोबरच, त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो, शूटिंगदरम्यानचे व्हिडीओ, सहकलाकारांबरोबरचे रील चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.
-
अभिनेता राकेश बापटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअऱ केले असून चाहत्यांची या फोटोंना पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
-
अभिनेत्याचा चाहतावर्ग मोठा असल्याचे पाहायला मिळते.
-
सध्या अभिनेता नवरी मिळे हिटलरला मालिकेतील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
शिस्तबद्ध, प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असे वाटणारा एजे व वेंधळेपणा करणारी लीला अशी या मालिकेतील ही पात्रे आहेत.
-
एजे-लीलाची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(सर्व फोटो सौजन्य: राकेश बापट इन्स्टाग्राम)
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…