-
मुंबई ही व्यापारी दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाचे शहर आहे. भारताची आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख आहे. (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
-
अनेक श्रीमंत व्यक्ती या मुंबई शहरात राहतात. मुकेश अंबानीपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत अनेक श्रीमंत व्यक्तींचे निवासस्थान हे मुंबईत आहेत. (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
-
आज आपण अशाच श्रीमंत व्यक्तींच्या घराबद्दल जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
-
अँटिलिया
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया मुंबईत आहे. त्याची किंमत १५००० कोटींहून अधिक आहे. हे केवळ मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात महागडे घर आहे. (फोटो सौजन्य: विकिपीडिया कॉमन्स) -
लिंकन हाऊस
सायरस पूनावाला यांच्या घराचे नाव लिंकन हाऊस असे आहे. हे घर दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी परिसरात आहे. हे शहरातील सर्वात सुंदर आणि मोठ्या घरांपैकी एक आहे, ज्याची किंमत सुमारे ७५० कोटी रुपये आहे. (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस) -
गुलिटा
ईशा अंबानी अंबानी आणि तिचे पती आनंद पिरामल यांच्या घराचे नाव गुलिता असे आहे. २०१२ मध्ये सुमारे ४५२ कोटी रुपयांना हे घर खरेदी करण्यात आले होते. (फोटो सौजन्य: फायनान्शियल एक्सप्रेस) -
जाटिया हाऊस
कुमार मंगलम बिर्ला यांचे घर जाटिया हाऊस म्हणून ओळखले जाते. हे मुंबईच्या मलबार हिल्समध्ये आहे. मॅजिक ब्रिक्सनुसार या घराची किंमत ४२५ कोटी रुपये आहे. (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस) -
जलसा
बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबासह जलसामध्ये राहतात. या घराची अंदाजे किंमत ११२ कोटी रुपये आहे. (फोटो सौजन्य: फायनान्शियल एक्सप्रेस) -
मन्नत
शाहरुख खानच्या बंगाल्याचे नाव मन्नत असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घराची किंमत २०० कोटींहून अधिक आहे. (फोटो सौजन्य: हाऊसिंग डॉट कॉम)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का