-
प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्य कलाकार अमृता खानविलकरने सोशल मीडियावर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर नियमितपणे व्हिडीओ शेअर करत सक्रिय असते.
-
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या खास लूकसाठी अमृताने पिवळ्या रंगाची शुद्ध सिल्कची बनारसी साडी नेसली आहे.
-
या साडीवर सोनेरी रंगाची जाड किनार आहे.
-
या साडीवर अमृताने पिवळा डिझायनर ब्लाउज परिधान केला आहे. ब्लाउजवरील स्लिव्हवर असलेली डिझाइन अधिक सुंदर आहे.
-
या साडीवर अमृताने परिधान केलेले मोत्याचे भरजरी दागिने, मोठे कानातले, मोत्याच्या बांगड्या आणि अंगठी यामुळे अमृताचे सौंदर्य झळाळून आले आहे.
-
या साडीवर अमृताने मोत्याचे वर्क असलेला बटवा तिच्यासह घेतला आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने काही कँडिड पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य :अमृता खानविलकर /इंस्टाग्राम )
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल