-
अभिनेत्री तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan) ही ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या तिच्या नवीन चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. या चित्रपटात तिने लोकप्रिय अभिनेते सुबोध भावेंबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.
-
अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तेजश्री प्रधानने सिच्युएशनशिप, बेंचिंग या संकल्पनाबाबत तिचे मत व्यक्त केले.
-
अभिनेत्रीने म्हटले, “जेन झी अशी जी संकल्पना आली आहे. ते सगळं मला भयंकर व भीतीदायक वाटायला लागलेलं आहे.
-
आपण रेड फ्लॅग्स, ग्रीन फ्लॅग्सबद्दल बोलायला लागलो आहोत. सिच्युएशनशिप, बेंचिंग हे काही क्षणांपुरते चांगले वाटतात; पण ते खूप मोठे रेड फ्लॅग आहेत. त्यापासून दूर राहा, असं मला सांगायचं आहे.
-
तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ते चांगलं नाही आणि त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. त्यामुळे बेंचिंग, सिच्युएशनशिप हे फार वाईट आहे.”
-
“मी आताच्या पिढीला खूप पाठिंबा देणारी आहे. मी स्वत:ला आजच्या दिवसाबरोबर पुढे नेऊया, असे म्हणणारी असले तरीही काही गोष्टींवर माझं ठाम मत आहे.
-
त्यातील ही मोठी गोष्ट आहे की, ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवता, त्या क्षणाला तुम्ही स्वत:ला बेंचिंगचा भाग बनवता.
-
कारण- आपल्या आई-वडिलांनी आपल्याला कायम प्राधान्य दिलंय. त्यामुळे नवीन येणारा मुलगा तुम्हाला प्राधान्य देत नसेल, तर आणि त्या बेंचवर बसवून ठेवणार असेल, तर ते तुमच्यासाठी चांगलं नाहीये, असं मला वाटतं.
-
जोपर्यंत आपण स्वत:ला चांगली वागणूक देत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणी चांगलं वागवावं ही जगात कोणाचीच जबाबदारी नाही.
-
त्यामुळे मी स्वत:ला कुठे ठेवताय, तिथून तुम्ही इतरांनी तुमच्याशी कसं, काय वागायचं आहे, त्यासाठी स्वत:साठीचे बेंचमार्कस सेट करताय.
-
सिच्युएशनशिपसारख्या गोष्टींपासून दूर राहा. या गोष्टी समजून घ्या”, असे म्हणत सिच्युएशनशिपसारख्या गोष्टी चांगल्या नसल्याचे तिने म्हटले आहे.
-
सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने मुक्ताची भूमिका साकारली आहे.(सर्व फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”