-
बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाचा टीझर आज रिलीज होणार आहे. सलमानने चित्रपटसृष्टीत ३५ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाईही केली. पण असेही काही चित्रपट आहेत ज्यांनी निर्मात्यांचे पैसे बुडवले आहेत आणि असेच सुरु राहिले असते तर सलमान खानवर फ्लॉप अभिनेत्याचा शिक्का नक्की बसला असता.
-
क्योंकी
२ नोव्हेंबर २००५ रोजी सलमान खान क्योंकी चित्रपटात करीना कपूर आणि रिमी सेनसोबत दिसला. चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. मात्र उत्कृष्ट संगीत असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकला नाही. या चित्रपटासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. कमाई फक्त १२ कोटी रुपये होती. मात्र या चित्रपटाला टीव्हीवर चांगला प्रतिसाद मिळाला.

सलमान खानचा सावन चित्रपट क्वचितच कोणाला आठवत असेल. लांब केसांच्या लूकमध्ये दिसणारा सलमानचा हा चित्रपट ५ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि त्याने ३.४७ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेत्री सलोनी आसवानी दिसली होती.

२० ऑक्टोबर २००६ रोजी अक्षय कुमार आणि प्रिती झिंटाबरोबर सलमान खानचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी ३५ कोटी रुपये खर्च केले होते. मात्र हा चित्रपट केवळ २५ कोटींचीच कमाई करू शकला.

मल्टिस्टारर चित्रपट सलाम-ए-इश्क २६ जानेवारी २००७ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे बजेट ३० कोटी रूपयांचे होते. मात्र अक्षय खन्ना, प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम, विद्या बालन सारखे स्टार्सही हा चित्रपट फ्लॉप होण्यापासून वाचवू शकले नाहीत. या चित्रपटाने केवळ २२.६८ कोटींची कमाई केली.

सलमान खानचा हा बिग बजेट चित्रपटही प्रेक्षकांना आवडला नाही. हा चित्रपट १७ ऑगस्ट २००७ रोजी प्रदर्शित झाला. अली लार्टरसोबत दबंग खानची जोडी हिट होईल अशी अपेक्षा होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

या चित्रपटात सलमान खानने त्याचा भाऊ सोहेल खान आणि प्रियांका चोप्रासोबत काम केले होते. हा चित्रपट १५ ऑगस्ट २००८ रोजी प्रदर्शित झाला होता. २० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट १२.०५ कोटीच कमावू शकला.

२४ ऑक्टोबर २००८ रोजी रिलीज झालेला मल्टी-स्टारर हिरोज देखील फ्लॉप ठरला. या चित्रपटावर निर्मात्यांनी १८ कोटी रुपये खर्च केले होते, तर कमाई फक्त १२.६३ कोटी होती. या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल, प्रिती झिंटा असे कलाकार होते.

२१ नोव्हेंबर २००८ रोजी सलमान खान स्टारर युवराज चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे बजेट जवळपास ५० कोटी होते. कतरिना कैफसोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा होती पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ १६.८९ कोटींचाच व्यवसाय करू शकला. युवराज हा त्या काळातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला होता.

सलमान खान आणि गोविंदाच्या पार्टनरमधील कॉमिक टायमिंग आणि दोन मुख्य नायकांमधील मैत्री प्रेक्षकांना खूपच भावली. या चित्रपटाने सलमानसोबतच गोविंदाचे करिअरही पुढे नेण्यास मदत केली. या चित्रपटाने ६० कोटींचा व्यवसाय केला होता. तर २८ कोटी बजेट होते.

सलमान खानच्या करिअरमधील वाईट काळानंतर वॉन्टेड हा एक असा चित्रपट ठरला ज्याने अभिनेत्याला इंडस्ट्रीचा नवा ॲक्शन हिरो बनवला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. यानंतर सलमान थांबलाच नाही. त्याने दबंग, रेडी, बॉडीगार्ड, एक था टायगर सारखे सुपरहिट चित्रपट दिले.
