-
Urmila Kothare Car Accident photos : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाला आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ उर्मिलाच्या कारचा अपघात झाला.
-
काल शुक्रवारी (२७ डिसेंबरला) घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
-
उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती, त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला.
-
चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
-
भरधाव कारने दोन मजुरांना उडवलं, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
-
एक मजूर गंभीर जखमी आहे.
-
या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाले आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्ज वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला.
-
उर्मिला शूटिंग संपवून घरी परतत असताना झालेल्या अपघातात तिची कारचा पुढचा भाग चेंदामेंदा झाला आहे.
-
याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
-
(अपघाताचे सर्व फोटो – IANS Hindi च्या व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा