-
विकी कौशल आणि कतरिना कैफ हे दोघेही इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांपैकी एक आहेत.
-
लग्नानंतर ते त्यांच्या फिल्मी करिअरवरही लक्ष केंद्रित करत आहेत. पण दरवर्षी हे स्टार कपल त्यांच्या कामाच्या व्यापातून काही वेळ ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी काढते. यंदाही दोघांनी सुट्टी घेतली आहे. कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले त्यांचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
-
कतरिना प्रत्येक सणाला विकीच्या आई-वडिलांबरोबर दिसते. पण यावेळी विकी कैफ कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. दोघेही कुटुंबियांबरोबर सुट्टीचा आनंद घेत आहेत.
-
या फोटोमध्ये विकी आणि कतरिना एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. हे स्टार कपल समुद्र किनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे. यावेळी दोघांनीही मॅचिंग काळे जॅकेट आणि टोपी घातलेली दिसत आहे.
-
या फोटोत कतरिना कैफ सेल्फी घेत आहे. थंडीपासून संरक्षणासाठी अभिनेत्रीने हिवाळ्यातील टोपी घातली आहे. कतरिना तिच्या बहिणी आणि भावासोबतचा वेळ एन्जॉय करताना दिसून आली.
-
या फोटोत विकी आणि कतरिना एकांतात एकमेकांचा हात धरून चालताना दिसत आहेत. त्यांचा हा रोमँचटिक अंदाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
हे कपल सध्या ब्रिटनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
-
(सर्व फोटो साभार कतरिना कैफ, विकी कौशल इन्स्टाग्राम पेज)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल