-
२३ डिसेंबरपासून झी मराठी वाहिनीवर ‘लक्ष्मीनिवास’ (Lakshmi Niwas) ही नवी मालिका (TV Serial) प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
या मालिकेत अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ‘भावना’ची भूमिका साकारत आहे.
-
‘भावना’ अत्यंत भावनिक मुलगी आहे. आई-वडिलांना समजून घेणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी, थोडी कमी बोलणारी आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी असलेली, अशी आहे.
-
अक्षयाने २०२४ च्या काही आठवणींनी सांगितल्या आहेत.
-
अक्षया म्हणाली… माझ्यासाठी २०२४ कमाल वर्ष होत, वर्षाची सुरुवात तितकीशी बरी झाली नव्हती.
-
२०२४ मध्ये मी पुन्हा एकदा झी मराठीवर काम करायला सुरुवात केली.
-
दुसरी गोष्ट मला नेहमीच व्यवसाय करायचा होता, तर २०२४ मध्ये मी व्यवसाय सुरू केला.
-
‘भरजरी – नाम’ या नावाने पुण्यात दोन मैत्रिणींनी बरोबर साड्यांचं दालन सुरू केले.
-
२०२४ ने मला शिकवले की कम्फर्ट झोन सोडावाच लागतो मग ते कामाच्या बाबतीत असो किंवा वैयक्तिक.
-
आयुष्यात करायच्या राहिलेली अनेक गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट मला वाटते की मी वजन कमी करायची प्रक्रिया थोडी आधी सुरु केली पाहिजे होती ती उशिरा सुरु केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)
“माझी पत्नी ग्रीन कार्डधारक असली तरी…”, ट्रम्पनंतर उपाध्यक्षांचाही सारखाच सूर; भारतीयांची चिंता वाढली