दक्षिण भारतीय साई पल्लवीचे संपूर्ण भारतात चाहते दिसून मिळतात.
प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने सोशल मीडियावर बहिणीच्या लग्नाच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.
तमीळ, मल्याळम व तेलुगू चित्रपटसृष्टीत साई पल्लवीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे स्वत:चा ठसा उमटवला आहे.
‘फिदा’, ‘गार्गी’, ‘मिडल क्लास अभय’ या चित्रपटांमध्ये काम करीत साई पल्लवीने प्रसिद्धी मिळवली आहे.
पूजा कन्नन म्हणजेच साई पल्लवीच्या बहिणीच्या लग्नातील फोटो शेअर करीत अभिनेत्रीने तिच्या विविध लूकचे फोटोही शेअर केले आहेत.
पहिल्या लूकमध्ये साई पल्लवीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
या साडीवर साई पल्लवीने मोत्याची माळ परिधान केली आहे .
माथ्यावर लाल रंगाची टिकली लावल्यामुळे साई पल्लवीच्या लूकला एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे.
पुढील लूकसाठी साई पल्लवीने सोनेरी रंगाची कांचीवरम साडी नेसली आहे.
तिसऱ्या लूकमध्ये साई पल्लवीची लाल रंगाची डिझायनर साडी आणि त्यावर काळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, अशी वेशभूषा आहे.
हळदीसाठी साई पल्लवी पिवळ्या रंगाच्या स्लीव्हलेस फ्रॉकमध्ये वावरली आहे.
पूजाच्या संगीत कार्यक्रमासाठी साई पल्लवीने निळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा प्लाझो परिधान केला आहे.
फ्रॉकमध्ये असलेली साई पल्लवीने पिवळ्या रंगाची कर्णफुले आणि सोनेरी रंगाच्या बांगड्या वापरल्या आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने सोशल मीडियावर बहिणीच्या लग्नाच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.
(सर्व फोटो सौजन्य : साई पल्लवी / इंस्टाग्राम)