-
रामचरणचा गेमचेंजर १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
-
प्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिटं ४५ सेकंदाचा असल्याची माहिती मिळते आहे.
-
भ्रष्ट व्यवस्थेबरोबर लढणाऱ्या आएएस अधिकाऱ्याची भूमिका राम चरण साकारत आहे. तर या राजकीय थ्रिलरपटात तो त्याच्या वडिलांचेही पात्र साकारताना दिसेल. चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
-
अभिनेत्री कियारा अडवाणी या चित्रपटात मुख्य अभिनेत्री आहे.
-
इतर कलाकारांमध्ये अंजली, समुथीराकानी, एस जे सूर्या, श्रीकांत आणि प्रकाश राज महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
-
चिरंजीवी यांचा अंदाज
चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी सांगितलं की मेगास्टार चिरंजीवी यांनी चित्रपट पाहिला आहे. -
चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी असा अंदाज वर्तवला की गेम चेंजर चित्रपट सर्वात मोठा हिट होणार आहे तसेच सिनेमाचा प्रभाव प्रेक्षकांवर झाल्याशिवाय राहणार नाही.
-
गेम चेंजर १० जानेवारी २०२४ रोजी रिलीजसाठी सज्ज आहे.
-
संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेलं असं बोललं जातंय.
-
(सर्व फोटो सारेगामा यूट्यूब चॅनलवरून साभार)
हेही पाहा- Photos : MTV ‘स्प्लिट्सविला’मधील लोकप्रिय अभिनेत्रीचं साडीमधील फोटोशूट व्हायरल

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?