-
जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali).
-
अभिनेत्रीने या मालिकेनंतर अनेक मालिका-चित्रपटांत काम केले.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
-
अभिनेत्री नुकतीच फुलवंती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘राजश्री मराठी’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत २०२५ साठी काय प्लॅन आहेत, असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला.”
-
त्यावर उत्तर देताना प्राजक्ता माळीने म्हटले, “मी निर्माती होणं हे माझं स्वप्न नव्हतं. हे मी कधीच प्लॅन केलं नव्हतं.”
-
“माझ्या वाट्याला माझं टॅलेंट दाखवलं जाईल, असे प्रोजेक्ट आले नाहीत म्हणून मला हे करावं लागलं.”
-
“मला असं वाटतं की, माझं टॅलेन्ट दाखवलंय. त्यामुळे आता माझ्याकडे चांगले प्रोजेक्ट यावेत. मला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायच्या आहेत.”
-
“माझा पहिल्यापासून हा उद्देश राहिला आहे की, मी पैसा कमवेन तो माझ्या आवडत्या गोष्टींमधून कमवेन. मग दागिने, अभिनय, मॉडेलिंग जे असेल, ते मी माझ्या कष्टातून पैसा कमवेल.”
-
“आता २०२५ चा माझा उद्देश हा आहे की, मी जो पैसा कमवेन, तो अभिनयातूनच कमवेन. फक्त अभिनयातून पैसे मिळावेत इतके अभिनयाचे प्रोजेक्ट मला मिळावेत. मला स्वत:चं प्रोड्युस करायचंच आहे; पण मला इतर भाषांमध्येसुद्धा प्रयत्न करायचे आहेत.”
-
“मला वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचं आहे. मला वेगवेगळ्या पद्धतीच्या जॉनर्समध्ये काम करायचंय.”
-
“मला अभिनय क्षेत्रात खूप काम करायचं आहे. असंच माझं २०२५ हे वर्ष असावं, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे.” (सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का