-
प्रियदर्शिनी इंदलकर(Priyadarshini Indalkar) ही अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली. नुकतीच ती ‘रुखवत’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
प्रियदर्शिनी इंदलकरने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली.अभिनय क्षेत्रातील स्पर्धेविषयी बोलताना प्रियदर्शिनीने म्हटले, “मला बऱ्याचदा रेस, असा विचार आला की, खूप दडपण येतं”
-
“आपण त्या रेसमध्ये आहोत का? आपण कुठल्या स्थानावर आहोत? पुढे कसं जायचं? आपण मागे पडत चाललोय का वगैरे प्रश्न पडतात. पण, त्याच वेळी हे सगळे क्षुल्लक विचार वाटतात.”
-
“म्हणजे तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहणं, हेच तुमच्या हातात आहे. बाकी हे रेस या गोष्टींमध्ये अडकल्यानंतर आपलं काम मागे पडत जातं.”
-
“खूप नकारात्मक विचार आपल्याला खायला लागतात. त्यामुळे असा एक विचार येण्याचा काळ होता की, माझ्याकडे अमुक अमुक गोष्ट नाहीये. माझ्याकडे अशा पद्धतीचं अभिनय करण्याचं कौशल्य नाहीये.”
-
” पण, स्वत:बद्दल असुरक्षितता तयार करण्याची काहीच गरज नसते. असा काळ होता की, मी असा विचार करत होते.”
-
“त्यावर माझं मलाच उत्तर सापडलं की, आपल्याकडे जे आहे, ते वाटण्याचा प्रयत्न करायचा आणि समोरच्याचं जे प्रेरित, आकर्षित करतं, ते घेण्याचा प्रयत्न करायचा.”
-
“तिथे स्पर्धा संपून जाते. तुम्ही एकमेकांकडून प्रेरणा घेत राहता. मला मनापासून वाटतं एकमेकांचं कौतुक करता यावं आणि त्याला स्पर्धा म्हणून न बघता, त्याला प्रेरणा म्हणून बघावं.”
-
“सगळ्यांची आयुष्यं खूप सोपी होतील, मूळात स्वत:चं आयुष्य सोपं होईल”, असे म्हणत प्रियदर्शिनीने तिचे मत व्यक्त केले आहे.(सर्व फोटो सौजन्य: प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य