-
‘बिग बॉस मराठी’चं पाचव्या पर्व गाजवणारी ‘किल्लर गर्ल’, ‘टास्क क्वीन’ अर्थात जान्हवी किल्लेकर सध्या खूप चर्चेत असते.
-
‘बिग बॉस मराठी’ संपल्यापासून जान्हवी ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, तसंच नव्या चित्रपटाच्या प्रिमियर सोहळ्यात दिसते.
-
अलीकडेच जान्हवी घनःश्याम दरवडेच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या कुटुंबासह त्याच्या गावी शुभेच्छा देण्यासाठी गेली होती. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
-
आता जान्हवी किल्लेकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
-
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर लवकरच्या नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकेत जान्हवी झळकणार आहे. याचा खुलासा ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमातून झाला आहे.
-
‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये सिद्धार्थ जाधवने जान्हवी किल्लेकर आता इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील भूमिकेत झळकणार असल्याचं जाहीर केलं आहे.
-
जान्हवी किल्लेकर आता ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘अबोली’मध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे.
-
याआधी जान्हवी किल्लेकर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती, जी चांगलीच गाजली. ( सर्व फोटो सौजन्य – जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम )

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य