-
मनोरंजनासाठी OTT प्लॅटफॉर्मवर भरपूर सामग्री उपलब्ध आहे. पण आजही अनेकांना टीव्हीवर मालिका किंवा सिनेमे पाहायला आवडतात. अशा प्रेक्षकांसाठी आज आपण या वर्षी सुरू होणाऱ्या मालिकांबद्दल जाणून घेणार आहेत.
-
मन्नत: हर खुशी पाने की
ही मालिका ६ जानेवारीपासून कलर्स टीव्हीवर सुरू होत आहे. या मालिकेत आयशा सिंग आणि अदनान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आई-मुलीच्या नात्यातील संघर्ष आणि भावना दाखविणारी कथा या मालिकेत असणार आहे. -
बिग बॉस १८ चा विजेता १९ जानेवारीला प्रेक्षकांना कळेल. कलर्सवर बिग बॉस संपल्यानंतर लाफ्टर शेफ सीझन २ सुरू होईल. या सिझनमध्ये अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. कॉमेडियन भारती सिंग पुन्हा एकदा शो होस्ट करताना दिसणार आहे.
-
मेरी भव्य लाईफ आणि चेटकी
ही मालिकाही कलर्सवर सुरू होईल. या मालिकेच्या प्रीमियरची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मालिकेची कथा स्वतःवर प्रेम करण्याचा संदेश देईल, अशी माहिती आहे. याशिवाय कलर्सवर लवकरच चेटकी ही हॉरर मालिकाही सुरू होणार आहे. तिचा प्रोमो आला आहे. मात्र, प्रीमियरची तारीख अद्याप कळलेली नाही. -
झी टीव्हीवर रामभक्त तुलसीदास ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका तुम्हाला तुलसीदासांचे जीवन आणि रामावरील त्यांचे प्रेम दाखवेल.
-
वृत्तांवर विश्वास ठेवला तर झी टीव्हीवर झी हॉरर शोचे पुनरागमन होणार आहे. या मालिकेने प्रेक्षकांना खूप घाबरवले आहे. आता पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांना घाबरवायला येत आहे.
-
सोनी टीव्हीवर लवकरच मास्टर शेफ इंडिया सुरू होणार आहे. या मालिकेत सेलेब्स स्वयंपाक करताना दिसणार आहेत. फराह खान हा शो होस्ट करणार आहे. शोमध्ये तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, गौरव खन्ना, चंदन प्रभाकर, अभिजीत सावंत आणि दीपिका कक्कर यांसारखे सेलिब्रिटी दिसणार आहेत.
-
अमी डाकिनी
सोनी टीव्हीवरही एक हॉरर मालिका सुरू होत आहे. या मालिकेचा टीझरही आला आहे. मात्र, या मालिकेच्या प्रीमियरची तारीख अद्याप समोर आलेली नाही. -
पॉकेट मे आसमान
पॉकेट मे आसमान लवकरच स्टार प्लसवर लॉन्च होणार आहे. या मालिकेत एका तरुण गरोदर मुलीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे जी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. (सर्व फोटो साभार- चॅनल्स सोशल मीडिया)
हेही पाहा – योगी आदित्यनाथ यांंनीच नाही तर अखिलेश यादवांच्या सरकारनेही बदलली आहेत उत्तर प्रदेशमधील ‘या’ ९ शहरांची नावे
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”