-
दीपिका पदुकोण ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. आत्तापर्यंततिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-दीपिका पदुकोण, इन्स्टाग्राम पेज)
-
दीपिकाने पदार्पण केलं ते ओम शांती ओम या चित्रपटापासून, त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.
-
दीपिका सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो अपलोड करत असते आणि चाहत्यांशी त्या माध्यमातून संपर्कात असते.
-
दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९८६ ला झाला. तिच्या वडिलांचं नाव प्रकाश पदुकोण आहे. ते प्रसिद्ध टेनिस स्टार आहेत.
-
दीपिकाने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रणवीर सिंग आणि तिची केमिस्ट्री रील लाईफ ते रिअल लाईफ अशी ठरली.
-
दीपिका आणि रणवीर यांचा विवाह २०१८ मध्ये झाला. या दोघांना नुकतीच एक मुलगी झाली आहे. या मुलीचं नाव दुआ असं आहे.
-
दीपिका आणि रणवीर यांच्या जोडीला दीपवीर असं म्हटलं जातं. या दोघांनी रामलीला, 83, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
दीपिका आणि रणबीर कपूर यांचंही अफेअर होतं. मात्र त्यातून बाहेर पडल्यानंतर तिच्या आयुष्यात रणवीर सिंग आला आणि या दोघांची मनं जुळली.
-
२०१९ हे असं वर्ष होतं की दीपिकाचा एकही चित्रपट त्या वर्षी प्रदर्शित झाला नाही. तरीही ती टॉप सेलिब्रिटी लिस्टमध्ये १० व्या स्थानी होती.
-
महाविद्यालयात असल्यापासूनच दीपिकाने मॉडेलिंग सुरु केलं होतं.
-
२००६ या वर्षी दीपिका किंगफिशर बेस्ट मॉडेल म्हणूनही निवडली गेली.
-
हिमेश रेशमियाच्या आपका सुरूर या अल्बममध्ये दीपिका पहिल्यांदा दिसली. त्यानंतर तिच्या आयुष्यात आला ओम शांती ओम. या चित्रपटानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही.

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का