-
मराठी मालिकाविश्वातील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’. याच मालिकेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
-
अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीची जागा मराठीसह हिंदी मालिकाविश्वात झळकलेली अभिनेत्री घेणार आहे.
-
आता मुक्ता म्हणून अभिनेत्री स्वरदा ठिगळे झळकणार असल्याचं समोर आलं आहे.
-
‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली स्वरदा ठिगळे काही दिवसांनी मुक्ता म्हणून पाहायला मिळणार आहे.
-
माहितीनुसार, स्वरदा लवकरच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
-
स्वरदा ठिगळेबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.
-
त्यानंतर स्वरदा हिंदी मालिकेत झळकली. तिने ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं.
-
तसंच स्वरदाने ‘प्यार के पापड’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या दोन हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा मराठी मालिकाविश्वाकडे वळाली.
-
‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत स्वरदाने ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली.
-
ताराराणी या भूमिकेसाठी स्वरदाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
-
गेल्या वर्षी स्वरदा लग्नबंधनात अडकली.
-
स्वरदाचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला होता. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
स्वरदाच्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे.
-
अभिनेत्रीचा नवरा सिद्धार्थ हा इंटिरियर डिझायनर असल्याची माहिती त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर दिली आहे. ( सर्व फोटो सौजन्य – स्टार प्रवाह, तेजश्री प्रधान आणि स्वरदा ठिगळे इन्स्टाग्राम )

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही