-
मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून सुकन्या व संजय मोने यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला आहे.
-
मात्र, त्यांच्या लेकीने आई-बाबांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवत ऑस्ट्रेलियात मोठं यश मिळवलं आहे.
-
सुकन्या मोने यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली.
-
गेली काही वर्षे जुलिया परदेशात तिचं मास्टर्स पूर्ण करत होती. आता नुकतंच तिचं शिक्षण पूर्ण झालं असून, अभिनेत्रीची लेक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे.
-
सुकन्या मोने यांनी लेकीने पदव्युत्तर पदवी ग्रहण केल्याची काही क्षणचित्र सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
अभिनेत्री लिहितात, “जुलिया सुकन्या संजय मोने…Master Degree In Animal Science From University Of Queensland Brisbane Australia. तिच्या पदवी ग्रहण समारंभाला गेले होते. त्याची काही स्मरणचित्रं…”
-
‘मास्टर इन अॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ बायोलॉजी’ या विषयात जुलियाने पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. तिच्या आई-वडिलांना सुरुवातीला या अभ्यासक्रमाबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण, या सगळ्या प्रवासात सुकन्या व संजय मोने यांनी तिला कायम पाठिंबा दिला.
-
आपल्या लेकीचं कौतुक करण्यासाठी सुकन्या मोने खास ऑस्ट्रेलियाला गेल्या होत्या. घरापासून लांब राहून परदेशात जॉब करून जुलियाने हे यश मिळवलं आहे.
-
“जॉब करून तिने स्वत:चा खर्च उचलला आणि तिकडे स्कॉलरशिप सुद्धा मिळवली. मला या सगळ्याचं खूप कौतुक आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय याची तिला कायम जाणीव असते.” असं सांगत सुकन्या मोने यांनी लेकीचं कौतुक केलं आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून जुलियावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सुकन्या मोने इन्स्टाग्राम )

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य