गॅरेजमध्ये राहिला, चाळीमध्ये वाढला; ‘या’ अभिनेत्यानं संघर्षातून मिळवलं मोठं यश, आज आहे अब्जावधींची मालमत्ता
आज आपण त्या अभिनेत्याबद्दल जाणून घेऊयात जो आज बॉलीवूडचा मोठा स्टार आहे, पण एकेकाळी आर्थिक अडचणीत होता. त्याला संघर्षाच्या दिवसांत कधी चाळीत तर कधी गॅरेजमध्ये दिवस काढावे लागले. हा अभिनेता कोण आहे सांगू शकाल का? या अभिनेत्याचे वडील राज कपूर यांच्या वडिलांचे चुलत भाऊ होते.
या फोटोमध्ये तो अभिनेता दिसत आहे. राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे या अभिनेत्याचे मामा होते. पण कपूर कुटुंबाशी एवढा जवळचा संबंध असूनही या अभिनेत्याला कधी चाळीत तर कधी गॅरेजमध्ये दिवस काढावे लागले. या अभिनेत्याने तेलगू चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि तो बॉलिवूडमध्ये आल्यावर सुपरस्टार झाला. चला या अभिनेत्याबद्दल माहिती घेऊ. (Photo: Social Media)या अभिनेत्याच्या वडिलांचे नाव सुरिंदर कपूर असून ते पृथ्वीराज कपूर यांचे चुलत भाऊ होते. या अभिनेत्याचा एक भाऊ चित्रपट निर्माता आहे आणि दुसरा भाऊ अभिनेता आहे. एक बहीणही आहे, जी फिल्मी जगापासून दूर आहे. (Photo: x.com/chintskap)ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलत आहोत तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अनिल कपूर आहे. (Photo: Social Media)अनिल कपूरला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्याला हिरो बनायचेच होते, पण वडील सुरिंदर कपूर याला विरोध करत होते. यामुळेच अनिलने वडिलांपासून लपून गुपचूप एका चित्रपटासाठी ऑडिशन दिले आणि त्याची त्यासाठी निवड झाली. तेव्हा तो फक्त १५ वर्षांचा होता. या चित्रपटाचे नाव होते ‘तू पायल मैं गीत’. यामध्ये अनिल कपूरने शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. (Photo: Social Media)अनिल कपूर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे कुटुंब असलेल्या कपूर कुटुंबातील असूनही त्याला चित्रपटसृष्टीमध्ये पाय रोवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यावेळी कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. परिस्थिती इतकी बिकट होती की अनिलच्या वडिलांकडे राहायला स्वतःचे किंवा भाड्याचेही घर नव्हते. त्यामुळे अनिल कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांना राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहावे लागले. (Photo: Social Media)नंतर अनिलच्या वडिलांनी मुंबईतील एका चाळीत खोली घेतली आणि कुटुंबासह तिथे स्थलांतर केले. अनिलने आपलं अभिनयाचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं होतं, पण त्याच बरोबर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत व्हावी म्हणून त्याने शिक्षणंही पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. (Photo: Social Media)वडिलांची तब्येत बिघडल्याने अनिलला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्पॉट बॉय म्हणूनही काम करावे लागले. त्यानंतर कलाकारांना विमानतळावर सोडणे, आणणे, झोपेतून उठवणे अशी कामेही तो करत असे.(Photo: Social Media)त्यानंतर अनिल कपूरने १९८३ मध्ये ‘वो सात दिन’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून एन्ट्री केली आणि तो लोकप्रिय झाला. यानंतर त्याने अनेक चित्रपट केले. १९८८ मध्ये विधू विनोद चोप्रा यांनी अनिल कपूरला त्यांच्या ‘परिंदा’ चित्रपटासाठी साइन केले. यामध्ये जॅकी श्रॉफने अनिलच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एका दृश्यासाठी जॅकी श्रॉफने परफेक्ट शॉट शूट होण्यासाठी अनिल कपूरला तब्बल १७ वेळा कानाखाली वाजवली होती. (Photo: Social Media)दरम्यान, एकेकाळी अनिल कपूर आणि त्याचे कुटुंब आर्थिक संकटात होते, पण आज अभिनेता १३४ कोटी रुपयांच्या म्हणजेच १.३४ अब्ज एवढ्या संपत्तीचा मालक आहे. (Photo: Social Media) हेही पाहा- प्रेमविवाह का यशस्वी होत नाहीत? विकास दिव्यकीर्ती यांनी सांगितली कारणं, म्हणाले…