-
दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी मराठीसह बॉलिवूड कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
आजवर रवी यांनी अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती (Movie Production) केली आहे.
-
रवी यांच्या ‘नटरंग’ (Natarang), ‘टाईमपास’ (Timepass), ‘न्यूड’ (Nude) अशा अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
-
रवी यांनी २०२५मध्ये नवं घर खरेदी (New House) केले आहे.
-
काही दिवसांपूर्वी नव्या घरात वास्तूशांती पूजा (Vastu Shanti Pooja) पारंपरिक पद्धतीने पार पडली.
-
रवी व पत्नी मेघना जाधव यांनी नव्या घरातील काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रवी यांनी हिरवा कुर्ता (Green Kurta Set) परिधान केला आहे तर, मेघना यांनी हिरव्या रंगाची नऊवारी साडी (Green Nauvari Saree) नेसली आहे.
-
‘बिवली बाहेरील दावडी गावातील छोट्याशा घरातून सूरू झालेला आमचा दोघांच्या स्वप्नांचा प्रवास आता इथवर येऊन पुन्हा नव्याने नवी स्वप्ने पहायला सज्ज झाला आहे. आमच्या घराच्या वास्तूशांतीचे हे काही खास क्षण. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या ही विनंती !!!’ असे कॅप्शन रवी यांनी फोटोंना दिले आहे.
-
रवी यांनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
रवी व मेघना यांची भेट १९९२ साली झाली. त्यांनी १९९८मध्ये लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).
-
(सर्व फोटो सौजन्य : रवी जाधव/इन्स्टाग्राम)

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग