-
बॉलीवूड अभिनेत्री शहनाज कौर गिलने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला तेव्हा तिचे वजन खूप जास्त होते पण आता ती खूप स्लिम आणि फिट आहे. अभिनेत्रीने शिल्पा शेट्टीला सांगितले की तिने तिचे वजन इतके कसे कमी केले आणि आता तिचा आहार कसा आहे. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
काही काळापूर्वी मिर्ची प्लसने एक व्हिडिओ पब्लिश केला होता ज्यामध्ये इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शेट्टी शहनाज कौर गिलची मुलाखत घेताना दिसली होती. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
या मुलाखतीत शहनाज गिलने तिच्या फिटनेस आणि डाएटबद्दलच्या गोष्टी शेअर केल्या. तिने वजन इतके कसे कमी केले याबद्दलही तिने सांगितले. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
शहनाज गिलच्या फिटनेसबाबत शिल्पा शेट्टी म्हणाली की, जेव्हा तिला बिग बॉसच्या घरात पाहिलं तेव्हापासून तिच्यात खूप बदल झाला आहे. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
शहनाज गिलने सांगितले की, जेव्हा ती बिग बॉसच्या घरातून बाहेर आली तेव्हा कोविड मुळे लॉकडाऊन होते. यावेळी तिने तिच्या फिटनेसबद्दल विचार केला की, यानंतर जेव्हा ती लोकांसमोर जाईल तेव्हा तिला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले पाहिजेत आणि म्हणाले पाहिजेत की ‘ही तिच लठ्ठ शहनाज आहे का’? (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
शहनाज गिलने पुढे सांगितले की, तिने कोणताही वेगळा डाएट फॉलो केला नाही. तिने तिचा आहार पूर्वीसारखाच ठेवला आणि आणखी काही गोष्टी त्यामध्ये जोडल्या. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
शहनाज गिल सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिते. यानंतर ती हळदीचे पाणी पिते. यामध्ये ती ऍपल सायडर व्हिनेगरचाही समावेश करते. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
शहनाज कौर गिलने उच्च प्रथिनयुक्त नाश्ता करते, ज्यामध्ये मूग, डोसा आणि मेथी पराठा यांचा समावेश असतो. अभिनेत्रीने सांगितले की आता ती जे काही खाते ते मर्यादेतच खात असते. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
याशिवाय शहनाजने सांगितले की, घरी राहूनही तुम्ही तुमचा फिटनेस सुधारण्यासोबतच वजनही कमी करू शकता. यासाठी प्रशिक्षकाची गरज नाही. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
या मुलाखतीत शिल्पा शेट्टीने शहनाजला विचारले की ती वर्कआउटसाठी जिममध्ये जाते की आणखी काय करते. यावर अभिनेत्री म्हणाली की ती कुठेही जात नाही आणि तिचा ७० टक्के फिटनेस तिच्या आहारावर अवलंबून आहे. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
पुढे अभिनेत्रीने सांगितले की पाणी खूप महत्वाचे आहे. कधीकधी ती काकडी किंवा स्ट्रॉबेरी मिसळलेले पाणी पिते. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते ज्यामुळे त्वचा चमकदार बनते. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया)
-
अभिनेत्रीने सांगितले की तिला सॅलड आवडते, ती भरपूर भाज्या आणि अंडी खाते. (फोटो: शहनाज गिल/सोशल मीडिया) हेही पाहा- Photos : अभिनेत्री हेमल इंगळे लग्नानंतर जोडीनं कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी नतमस्तक

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल