-
बजरंगी भाईजान या हिंदी चित्रपटातील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्राने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी हर्षालीने पिवळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
यामध्ये हाफ स्लिव्हचा ब्लाउज, लेहेंगा आणि त्यावर जाळीदार ओढणीचा समावेश आहे.
-
हर्षालीने परिधान केलेल्या या लेहेंग्यावर मिरर वर्क दिसत आहे.
-
या लेहेंग्यावर हर्षालीने हिरव्या आणि सोनेरी रंगाचे झुमके आणि माथ्यावर बिंदी परिधान केली आहे.
-
त्याचबरोबर हर्षालीने हातात पिवळ्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ते हर्षालीने पंजाबी अंदाजात केलेल्या केशरचनेने.
-
या देसी लूकमध्ये अभिनेत्री नक्कीच गोजिरवाणी दिसत आहे.
-
(सर्व फोट सौजन्य : हर्षाली मल्होत्रा/ इंस्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल