-
आमिरने त्याच्या चित्रपट करिअरमध्ये अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
-
पण या काही चित्रपटांनी निर्मात्यांचे पैसे बुडवले. यामधील काहींवर अभिनेत्याने स्वतःही पैसे गुंतवले होते.
-
ठग्स ऑफ हिंदोस्तान
महागडे सेट, मोठी स्टारकास्ट आणि जोरदार प्रमोशन असूनही य चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडली नाही. आमिरच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे. या चित्रपटासाठी ३१० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पण कमाई फक्त १५० कोटी रुपये होती. -
लाल सिंग चड्ढा
आमिर खानच्या सर्वात मोठ्या फ्लॉप्समधील लाल सिंग चड्ढा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने १८० कोटी रुपये खर्च केले होते. पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या या चित्रपटाने देशभरात केवळ १२९ कोटींची कमाई केली. -
मंगल पांडे: द रायझिंग
स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्यावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटासाठी अभिनेत्याने स्वतःला पूर्णपणे बदलले होते. पण हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही आवडला नाही. ४० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ २७ कोटींची कमाई केली. -
अंदाज अपना अपना
सलमान खानबरोबरचा अंदाज अपना अपना हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला नाही. पण जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला तेव्हा तो सुपरहिट झाला. आजही या चित्रपटाची गणना क्लासिक कॉमेडी चित्रपटांमध्ये केली जाते. -
मेला
आमिर खान आणि त्याचा भाऊ फैसल खान यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. कमकुवत कथा आणि अभिनयामुळे हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही सुमार दर्जाचा वाटला होता. त्यावेळी या चित्रपटावर जवळपास १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर चित्रपटाने केवळ २३ कोटीच कमावले होते. -
अकेले हम अकेले तुम
आमिर खान आणि मनीषा कोईराला यांची भूमिका असलेला हा चित्रपट एका संगीतकाराच्या कथेवर आधारित होता. निर्मात्यांनी चित्रपटावर ६ कोटी रुपये खर्च केले होते आणि केवळ ३.५ कोटी रुपये कमावले होते.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”