-
रेश्मा पाठोपाठ आता ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे.
-
या अभिनेत्याचं नाव आहे अंबर गणपुळे. येत्या काही दिवसांत अंबर व शिवानी यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
-
रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने अंबर गणपुळेच्या केळवणासाठी जय्यत तयारी केली होती.
-
अंबर-शिवानीचं केळवण हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं.
-
या जोडप्याच्या केळवणासाठी सुंदर अशी फुलांची सजावट करून केळीच्या पानावर ‘शिवानी-अंबरचं केळवण’ असं लिहिण्यात आलं होतं.
-
शिवानी व अंबर यांच्या केळवणाला रेश्मा शिंदे, विदिषा म्हसकर, शाल्मली टोळ्ये, आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर, तनिषा विषे, पूर्णिमा तळवलकर असे मालिकेतील सगळे कलाकार उपस्थित होते.
-
या जोडप्याच्या केळवणाचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
शिवानी आणि अंबरचा साखरपुडा गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला होता. यानंतर ही जोडी विवाहबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
अंबर-शिवानीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अंबरने आतापर्यंत ‘रंग माझा वेगळा’, ‘दुर्वा’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, शिवानी ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकांमध्ये झळकली आहे. ( फोटो सौजन्य : शिवानी सोनार व अंबर गणपुळे इन्स्टाग्राम )
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य