-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे गेली दोन वर्षे ‘अक्षरा’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेत शिवानी अक्षराचं पात्र साकारत असली तरीही अधिपती तिला प्रेमाने मास्तरीण बाई अशी हाक मारतो. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात शिवानीला मास्तरीण बाई ही नवीन ओळख मिळाली आहे.
-
शिवानी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मालिकेचे प्रोमो, वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स, फोटोशूट या सगळ्या गोष्टी शिवानी इन्स्टाग्रामवर शेअर करते.
-
सध्या अभिनेत्रीच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. कारण, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शिवानीने आपल्या चाहत्यांनाच प्रश्न विचारला आहे.
-
शिवानीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, “शोभते आहे ना मास्तरीणबाई? चष्मा की नो चष्मा? सध्या सतत पडलेला प्रश्न!” असं म्हटलं आहे. हे कॅप्शन वाचून आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
‘पारू’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या पूर्वा शिंदेने यावर “नो चष्मा’ जास्त गोड दिसतेस” अशी कमेंट केली आहे. यावर शिवानीने, “हे मी लक्षात ठेवेन डार्लिंग” असं उत्तर दिलं आहे.
-
शिवानीच्या असंख्य चाहत्यांनी या फोटोशूटवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी ‘तू चष्मा घालत जा’ असा सल्ला अभिनेत्रीला दिलाय. तर, काहींनी ‘नो चष्मा’ जास्त छान दिसतेस असं म्हटलं आहे. याशिवाय काही जणांनी शिवानीला सगळेच लूक सूट होतात असंही प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे.
-
मास्तरीण बाईंचं हे फोटोशूट तिच्या चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरलं आहे. “खूपच छान…”, “झकास मास्तरीण बाई” अशा कमेंट्स शिवानीच्या फोटोंवर आल्या आहेत.
-
दरम्यान, शिवानी रांगोळेसह ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत हृषिकेश शेलार, कविता मेढेकर, स्वप्नील राजशेखर हे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे इन्स्टाग्राम )

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल