-
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी झालेली शिल्पा शिरोडकर ९०च्या दशकातील बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री असून सेन्सेशनल क्वीन म्हणून तिला ओळखलं जातं.
-
१९८९मध्ये रमेश सिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ चित्रपटातून शिल्पाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
-
शिल्पाने २०००मध्ये लग्नानंतर बॉलीवूडला रामराम केला. ती लंडनला गेली आणि तिथे ती वैवाहिक आयुष्य एन्जॉय करू लागली.
-
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सर्वकाही सोडून शिल्पा गृहिणी झाली.
-
शिल्पाचा नवरा बँकर असून अपरेश रंजीत असं त्याचं नाव आहे. दोघांना एक मुलगी आहे; जिचं अनुष्का नाव आहे.
-
२००३मध्ये शिल्पाची मुलगी अनुष्काचा जन्म झाला.
-
अनुष्का रंजीतने स्कॉटलँडमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. तसंच २०२१मध्ये तिने नॉर्थ लंडन कॉलेजमध्ये पदवी घेतली होती.
-
अनुष्का पल्स क्रिएटिव्ह कलेक्टिव कंपनीची फाउंडिंग डायरेक्टर आहे.
-
अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ( सर्व फोटो सौजन्य – शिल्पा शिरोडकर इन्स्टाग्राम )

Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम