-
‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) या मालिकेत वसुंधरा हे पात्र अक्षया हिंदळकर(Akshaya Hindalkar)ने साकारले आहे.
-
अक्षया हिंदळकरने कलाकट्टाला मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षयाला तिच्या अपघाताविषयी विचारण्यात आले.
-
यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “मी याआधी एक मराठी मालिका केली, त्यानंतर मी हिंदीसाठी खूप प्रयत्न केले. खूप ऑडिशन दिल्या. त्यानंतर मी एक हिंदी ऑडिशन क्रॅक केली, त्यामध्ये मी फायनल झाले.”
-
“त्यानंतर माझं असं झालं की मी मराठी मुलगी हिंदी मालिकेत करणार होते, तर तो आनंदच वेगळा होता. घरीसुद्धा सगळे खूश झाले. आमच्या मालिकेचा मुहूर्त होता, त्या दिवशी मी साडी नेसणार होते.”
-
“त्याच्या दोन-तीन दिवसांआधी मी ब्लाऊज शिवायला दिला होता. तो आणण्यासाठी मुहूर्ताच्या आदल्या दिवशी मी स्कूटीवरून गेले.”
-
“जो मोठा सिग्नल असतो, तिथे एक काका सिग्नल हिरवा झाल्यानंतर रस्ता ओलांडत होते, त्यावेळी मी स्पीडमध्ये होते. त्यांना वाचवायला गेले व माझा अपघात झाला. त्यानंतर ती मालिका माझ्या हातातून गेली.”
-
“मी दीड वर्ष चालू शकत नव्हते. डॉक्टरसुद्धा म्हणाले की तिला चालायला वेळ लागेल. त्यानंतर मी नैराश्यात गेले, कारण काम गेलं होतं. त्यादरम्यान खूप गोष्टी कळल्या. स्वत:बद्दल, आपल्या माणसांबद्दल अनेक गोष्टी समजल्या.”
-
“मला वाटतं की त्या अपघाताने मला खूप शिकवलं. आताची जी मी आहे, ती खूप वेगळी आहे. खूप सकारात्मक, खूप आनंदात आहे. जसं मी कायम म्हणते की मी खूप सुखात आहे. कारण मला वाटतं की या जगातील कुठलीही गोष्ट असू दे, जे चांगलं होणार आहे, तेही जाणार आहे आणि जे वाईट आलंय आयुष्यात, तेही एक दिवस जाणार आहे.”
-
“अशा विचारांनी आयुष्य जगतेय. मी आशा करते की, मी जे या वर्षभरात शिकलेय तेच कायम ठेवेन आणि कायम सुखात राहीन”, असे म्हणत अक्षयाने तिच्या अपघातानंतर त्यातून ती काय शिकली, याबद्दल भावना व्यक्त केल्या. (सर्व फोटो सौजन्य: अक्षया हिंदळकर इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”