-
मराठी कलाविश्वात सध्या अनेक कलाकारांची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता अंबर गणपुळे आणि ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार हे दोघंही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
या जोडप्याने गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा केला होता. यानंतर त्यांचे चाहते शिवानी आणि अंबरच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.
-
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या टीमने काही दिवसांपूर्वीच या जोडप्याचं थाटामाटात केळवण केलं होतं.
-
सध्या या दोघांच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
-
शिवानी आणि अंबरचा मेहंदी आणि संगीत सोहळा नुकताच पार पडला.
-
मेहंदी सोहळ्याला या दोघांनी Twinning केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
या दोघांची लग्नपत्रिका सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामध्ये लग्नाची तारीख २१ जानेवारी अशी नमूद करण्यात आली आहे.
-
याशिवाय अंबर-शिवानीच्या प्री-वेडिंग फोटोशूटवर सुद्धा चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या जोडप्याने दोघांच्या नावाची फोड करून लग्नात #AmbAni असा हॅशटॅग वापरला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार इन्स्टाग्राम व twoseaters.in )
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य