-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून अभिनेत्री तेजश्री प्रधान खूपच चर्चेत आली आहे.
-
पण, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान सध्या काय करते? हे तुम्हाला माहितीये का?
-
तेजश्रीने नुकतेच इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सध्या काय करते? हे समोर आलं आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानने प्राजक्ता माळीच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.
-
प्राजक्ता माळीचे गुरु श्री श्री रविशंकर आहेत, जे आता सर्वश्रुत आहे. याच श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात तेजश्री सध्या वास्तव्यास आहे.
-
याच आश्रमातील जेवणाच्या ताटाचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या जेवणाच्या ताटात वरण-भात, पापड, भाजी, असे काही पदार्थ पाहायला मिळत आहे.
-
त्यानंतर तेजश्रीने वासराबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री वासरला हात लावताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तेजश्रीने लिहिलं की, आम्ही एकमेकांसारखे चेहरे केलेत की नाही…आणि यांच्या डोळ्याचं काय करायचं…किती तो निरागसपणा.
-
तेजश्रीने आश्रमातील बरेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तेजश्री खास मैत्रीण पूजाबरोबर पाहायला मिळत आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…