-
अनन्या पांडेने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने आधुनिक आणि पारंपारिक यांचा मिलाफ दाखवला आहे. चेक प्रिंट साडीमधील तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
गजरा आणि नाकातील नथीसह परफेक्ट असा लूक करत
अनन्याने मॉडर्न स्टाईलमध्ये साडी कॅरी केली आहे. तिच्या केसातील गजरा, कपाळावरील लहान बिंदी तिचे सौंदर्य आणखी वाढवत आहे. अनन्या अशा अवतारात यापूर्वी कधीही दिसली नाही. -
अनन्याने चेक प्रिंटचा ब्लाउज अतिशय वेगळ्या आणि बोल्ड पद्धतीने परिधान केला आहे. फॅशनच्या बाबतीत ती किती प्रयोगशील आहे हे तिच्या या फोटोंना पाहून लक्षात येईल.
-
अनन्या पांडे तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. प्रत्येक वेळी तिचा प्रयोगशील आणि ट्रेंडी लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनतो. अभिनेत्रीच्या या नव्या स्टाइललाही खूप पसंती दिली जात आहे.
-
ऐसे ना मुझे तुम देखो, परमसुंदरी, इतनी खुबसूरत क्यों हो, अशा प्रतिक्रिया तिला कमेंटमध्ये मिळत आहेत. तिचा हा साडीचा लूक आधुनिकतेचा आणि पारंपरिकतेचा उत्तम मिलाफ आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
-
‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
यानंतर तिने पती, पत्नी और वो आणि ड्रीम गर्ल २ सारख्या हिट चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यासोबतच ती फॅशनच्या जगातही चमत्कार करत आहे.
-
अनन्या पांडे सायबर-थ्रिलर वेब सीरीज CTRL आणि Bae मध्ये झळकली आहे. -
(सर्व फोटो साभार- अनन्या पांडे इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”