-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली आहे.
-
आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेत स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच स्वरदा खूप चर्चेत आली आहे.
-
नुकतंच स्वरदाने गुलाबी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गुलाबी साडीत स्वरदाची मनमोहक अदा पाहायला मिळत आहे.
-
स्वरदाने गुलाबी साडीवर साधा लूक केला आहे.
-
गुलाबी साडीतल्या स्वरदाच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
स्वरदा ठिगळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यानंतर ती हिंदी मालिकेत झळकली.
-
तिने ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तिने ‘प्यार के पापड’ या मालिकेतही काम केलं. या दोन हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा मराठी मालिकेत झळकली.
-
‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत तिने ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. ( सर्व फोटो सौजन्य – स्वरदा ठिगळे इन्स्टाग्राम )

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य