-
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. हिनाने गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये स्टेज-थ्री ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती दिली होती.
-
या बातमीने केवळ हिनाचे चाहतेच नाही तर स्टार्सही हादरुन गेलेले. मात्र, कॅन्सरसारखा गंभीर आजारही हिनाला खचवू शकला नाही.
-
कॅन्सरशी लढा देतानाच हिना तिच्या चाहत्यांसह प्रेरणादायी गोष्टीही शेअर करत आहे. दरम्यान, हिनाने तिचे काही नवे फोटो पोस्ट केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.
-
हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना आतापर्यंत दीड लाख लाईक्स आले आहेत.
-
तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार घेणाऱ्या हिनाचे या फोटोंमधील स्मित हास्य सर्वांचे मन जिंकत आहे.
-
हिनाच्या आउटफिटबद्दल सांगायचे तर तिने गुलाबी रंगाचा रॅप-अप ड्रेस परिधान केलाय.
-
याबरोबर हिनाने सोनेरी रंगाचे कानातले आणि हातात घड्याळ घातले आहे.
-
याशिवाय तिने स्टायलिश चष्मा घातला आहे. हिनाची हेअरस्टाईलही तिच्या ड्रेसला चांगली शोभते आहे. तर काळ्या हाय हिल्स हा लुक पूर्ण करत आहेत.
-
हिनाची वेब सीरीज ‘गृहलक्ष्मी’ या महिन्यात १६ जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म EPIC ON वर रिलीज झाली आहे.
-
‘गृहलक्ष्मी’ वेब सीरिजमध्ये हिनाने एका धाडसी आणि सशक्त महिलेची भूमिका साकारली आहे. हेही पाहा- Photos : जग्गी वासुदेव यांच्या आश्रमाला अभिनेत्री सायली संजीवची भेट; व्यक्त केल्या भावना, फोटो व्हायरल

Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम