-
प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी अलीकडेच सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापन दिनी विशेष शोचे आयोजन केले होते, ज्यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली.
-
स्टार्सनी स्टेजवर रॅम्प वॉकही केला आणि आता आलियापासून दीपिकापर्यंत अनेक अभिनेत्रींचे लूक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
दीपिका आई झाल्यानंतर पहिल्यांदाच रॅम्प वॉक करताना दिसली. यादरम्यान, तिने पांढरी पँण्ट, टॉप आणि ट्रेंच कोटसह जबरदस्त सब्यसाची नेकलेस परिधान केला.
-
तर या कार्यक्रमात आलिया भट्ट काळ्या रंगाची साडीमधील सुंदर लूकमध्ये दिसली.
-
यावेळी सोनम कपूरने अतिशय अनोखा काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता, ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
-
अनन्या पांडेने पोल्का डॉट्ससह काळ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला. या आउटफिटसोबत तिने सुंदर ज्वेलरीही कॅरी केली.
-
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ मॅचिंग ब्लॅक आउटफिट्समध्ये दिसले. अभिनेत्रीने फ्लोअर-लेन्थ अनारकली ड्रेस घातला होता, तर सिद्धार्थने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.
-
याशिवाय बिपाशा बासू, कुशा कपिला, शर्वरी वाघ आणि शबाना आझमी यांच्यासह अनेक अभिनेत्री या कार्यक्रमात उपस्थित होत्या.
-
(सर्व फोटो साभार अभिनेत्री इन्स्टाग्राम)

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल