-
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघसह महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.
-
आता हेमंत ढोमे व क्षिती जोगने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. लग्नाचा जेव्हा निर्णय घेतला, त्यावेळी जवळच्या लोकांची प्रतिक्रिया काय होती, यावरदेखील त्यांनी वक्तव्य केले आहे.
-
हेमंत ढोमेने म्हटले की, प्रेमात पडल्याची जाणीव आधी मला झाली. पण, मी थेट लग्न करण्याचे ठरवले. कारण मला असं वाटायचं की आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती यायला हवी की जी खूप महत्वाकांक्षी असेल, आपल्या महत्वाकांक्षा समजून घेईल, आपल्याला पाठिंबा देईल.
-
तिच्याशी बोलता-बोलता मला समजलं की ती स्वत: खूप महत्वाकांक्षी आहे. मेहनती आहे, आपल्याला सांभाळू शकते. तर मग मी विचार केला की लग्नच करायचं. मी माझ्या एक-दोन मित्रांनाही सांगितलं.
-
समीर, सिद्धार्थ चांदेकर होते, तर मी त्यांना सांगितलं की मला ती आवडते आणि मला लग्नच करायचं आहे. मग त्यांनाही प्रश्न पडले की वयामधील अंतर आणि ती या क्षेत्रात सीनिअर आहे. आम्ही दोन महिन्यात ठरवलं होतं की लग्न करायचं आहे.
-
क्षितीने यावर बोलताना म्हटले की माझी मुग्धा कर्णिक ही मैत्रीण आहे. जी आता झी मराठीच्या पारू मालिकेत अहिल्यादेवीचे पात्र साकारत आहे. ती माझी सगळ्यात जवळची आणि सगळ्यात जुनी मैत्रीण आहे.
-
तिला मी जेव्हा हेमंतबरोबर लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं, तेव्हा ती मला म्हणाली, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस का? कारण तुमच्यात काहीच जुळत नाही, असं एक मत होतं.
-
मी म्हटलं की मी ठाम नाहीये, पण माझं हे ठरलंय की हे करायच आहे. पुढे जे होईल ते आपण बघू. अशी आठवण क्षितीने सांगितली.
-
हेमंत ढोमे दिग्दर्शित’फसक्लास दाभाडे’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे, महत्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: क्षिती जोग इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…