-
ग्लॅमर दुनियेत नाव कमावण्यासाठी कलाकार खूप मेहनत करतात. अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या जास्त काळ लोकप्रियतेची चमक सहन करू शकल्या नाही आणि त्यांनी चैनीचे आरामदायी जीवन त्यागले आहे.
-
या अभिनेत्री ग्लॅमरचं जग सोडून धर्माकडे वळल्या
एकेकाळी चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका करणारी ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर श्री यमाई ममता नंदगिरी महामंडलेश्वर झाली आहे. ममतापूर्वी अनेक अभिनेत्रींनी ग्लॅमरचे जग सोडून धर्माचा मार्ग स्वीकारला आहे. अशी ७ चेहऱ्यांबद्दल जाणून घेऊ ज्यांनी ग्लॅमरचे जग सोडून सर्वांना धक्का दिला. -
ममता कुलकर्णी
ममता कुलकर्णी करण-अर्जुन, सबसे बड़ा खिलाडी, क्रांतिवीर, वक्त हमारा है अशा अनेक हिट चित्रपटांची नायिका आहे. ९० च्या दशकात ती तिच्या बोल्ड इमेजसाठी प्रसिद्ध होती. तिचे नाव अंडरवर्ल्ड आणि २००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातही आले होते. आता ती महामंडलेश्वर आहे. दरम्यान, ममता असा दावा करते की तिचा चित्रपटांकडे कल १९९६ मध्ये सुरू झाला. ममता असंही सांगते की २००० ते २०१२ पर्यंत तिने १२ वर्षे सातत्याने तपश्चर्या केली आणि ब्रह्मचर्य पाळले. -
अनघा भोसले
अनुपमा या मालिकेत काम केलेल्या अनघा भोसलेने जेव्हा ग्लॅमरची दुनिया सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिचे चाहते दु:खी झाले होते. ती मुंबई सोडून पुण्याला स्थायिक झाली. यानंतर, तिच्या रील व्हिडिओमध्ये अनेकदा वृंदावनमध्ये दिसते. अनघाने तिचे जीवन कृष्ण भक्तीसाठी समर्पित केले आहे आणि तिचे नवे नाव राधिका गोपी माताजी असे बदलले आहे. -
नुपूर अलंकार
१०० हून अधिक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर नुपूर आता एका साध्वीचे जीवन जगते आहे. २०२२ साली तिने इंडस्ट्री सोडून भक्तीचा मार्ग स्वीकारला. नुपूरने सांगितले होते की, लोकांना वाटते की ती जीवना कंटाळून साध्वी झाली आहे. पण स्पष्ट केले होते की ती जीवनात आनंदी होती पण धर्माच्या मार्गावर जायची ईच्छा असल्याने तिने पती आणि घर सोडले आहे. -
बरखा मदन
१९९६ मध्ये आलेल्या खिलाडी का खिलाडी या चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम करणाऱ्या बरखा मदानने सात फेरे आणि न्याय यासारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बरखा २०१२ मध्ये मॉन्क (भिक्खू) बनली. -
झायरा वसीम
झायरा वसीमने दंगलसारख्या ब्लॉकबस्टरमध्ये काम केले आहे. ग्लॅमर दुनियेच्या ग्लॅमरच्या दुनियेला ती खूपच लवकर कंटाळली. पदार्पणाच्या ५ वर्षांनंतर २०१९ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट करून तिने मनोरंजन क्षेत्रा बाहेर पडण्याची घोषणा केली. झायराने ती कुराणने दाखवलेल्या मार्गावर चालणार असल्याचे सांगितले होते. -
सना खान
बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या सना खानने एंटरटेनमेंट इंडस्ट्री सोडून लोकांना आश्चर्यचकित केले. यानंतर तिने मुफ्ती अनस सय्यदशी लग्न केले, आता त्यांना दोन मुले आहेत. सनाची जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. ती नेहमी हिजाबमध्ये दिसते आणि इतर कपडे परिधान करणे गुन्हा मानते. -
सुचित्रा सेन
अभिनेत्री मुनमुन सेन यांच्या आई सुचित्रा सेन यांनी 25 वर्षे मनोरंजन जगात काम केले. यानंतर त्यांनी त्यांचे आयुष्य रामकृष्ण मिशनला वाहून दिले. २०१३ मध्ये त्यांचे निधन झाले. (सर्व फोटो सौजन्य- सोशम मीडिया) हेही पाहा- Photos: दीपिका पादुकोण, शर्वरी वाघ ते आलिया भट्ट, सब्यसाचीच्या वर्धापनदिनामधील अभिनेत्रींच्या लूक्सने वेधलं लक्ष

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक