-
प्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘फसक्लास दाभाडे’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
या चित्रपटातून मिताली मयेकर आणि नवरा सिद्धार्थ चांदेकर यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.
-
या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाची संपूर्ण टीम पुणे शहरात पोहचली होती. या कार्यक्रमासाठी मितालीने खास मराठमोळा लूक केला आहे.
-
या लूकसाठी मितालीने जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
या साडीवर अभिनेत्रीने विविध प्रकारचे दागिने परिधान केले आहेत.
-
यामध्ये सोन्याची गादी ठुशी, पुतळी हार आणि मंगळसूत्राचा समावेश आहे.
-
त्याचबरोबर मितालीने कानात सोन्याची लहान कर्णफुले परिधान केली आहेत.
-
नाकात परिधान केलेल्या नथीमुळे मितालीचा हा मराठमोळा लूक पूर्णत्वाला आला आहे.
(सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर / इंस्टाग्राम)