-
फर्स्टक्लास दाभाडे या चित्रपटाच्या टीमने नुकताच नवशक्ती या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी बोलताना सिद्धार्थ(Siddharth Chandekar) ने त्याच्या लग्नातील आठवण सांगितली.
-
सिद्धार्थने म्हटले, “आम्ही नाचून-नाचून थकलो होतो. त्यानंतर आमच्या दोघांचं भांडण झालं. भांडण वेगळ्याच कारणावरून सुरू झालं होतं. कारण छोटच होतं, त्याचं रूपांतर खूप मोठ्या भांडणामध्ये झालं होतं.”
-
“हे पहाटे साडेतीन वाजता सुरू होतं. त्यानंतर तीन तासांनी विधींना बसायचं होतं.”
-
“तर साडेतीन वाजता आमच्या भांडणाला सुरूवात झाली. त्यानंतर हिच्या खोलीत दोन मैत्रीणी होत्या, त्या बाहेर आल्या. माझे भाऊ, मित्र वैगेरे बाहेर आले.”
-
“एका पॉइन्टनंतर ते असं विचारायला लागले की आलार्म लावू ना सकाळचा? लग्नासाठी उठायचं आहे ना? तुमचं काय ठरलं आहे? ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही एकमेकांना तुझे नातेवाईक बघ ना, असे मोठमोठ्याने म्हणत होतो. “
-
पुढे मितालीने सांगितले की, जेव्हा आम्ही खूप भांडलो. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले.
-
त्यानंतर पाच मिनिटानंतर सिद्धार्थ मला सॉरी म्हणायला आला.माझं चुकलं, सॉरी वैगेरे तो म्हणाला. त्यानंतर ते भांडण मिटलं, असे हसत मितालीने सांगितले.
-
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील प्रेक्षकांच्या लाडक्या जोडप्यांपैकी एक आहे. या जोडीचा चाहतावर्ग मोठा आहे.
-
फसक्लास दाभाडे या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ व मिताली पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसले आहेत. या चित्रपटात त्यांनी नवरा-बायकोची भूमिका साकारली आहे. (सर्व फोटो सौजन्य: सिद्धार्थ चांदेकर इन्स्टाग्राम)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का