-
‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिता हे अर्जुनच्या सख्ख्या बहिणीचं पात्र अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेत सुभेदारांचं घर अस्मिताशिवाय कायम अपूर्ण वाटतं. अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसारात ती कायम काही ना काही कुरघोड्या करत असते. मालिकेत मोनिका खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
-
मालिकेत अस्मिताच्या नवऱ्याला दाखवेललं नाही, ती माहेरी राहत असते असं कथानक आहे. पण, डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमापासून मोनिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा चर्चेत आला आहे.
-
अस्मिता म्हणजेच मोनिका लवकरच आई होणार आहे. यानिमित्ताने ‘ठरलं तर मग’च्या टीमने सेटवरचं मोनिकाचं डोहाळेजेवण केलं. यावेळी अभिनेत्रीचा नवरा देखील उपस्थित होता.
-
मोनिकाच्या पतीचं नाव चिन्मय कुलकर्णी असं आहे. डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
चिन्मय कुलकर्णीचं छोट्या पडद्याशी खास कनेक्शन आहे. टेलिव्हिजनवरच्या रिॲलिटी शोजचा स्टार लेखक म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या एका Stand Up कॉमेडी शोमध्ये तो सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव’, ‘स्टार प्रवाह ढिंच्यॅक दिवाळी २०२३’, ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमांचं लिखाण चिन्मय कुलकर्णीने केलेलं आहे. यासाठी वाहिनीने त्याचा सन्मान देखील केला होता.
-
वैयक्तिक आयुष्यात चिन्मय आणि मोनिका लवकरच बाळाचं स्वागत करणार आहेत. या जोडप्याने हातात लहान बाळाचे शूज घेऊन छानसं फोटोशूट करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली होती.
-
मोनिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या जोडप्याचे युट्यूब vlogs सुद्धा चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे व चिन्मय कुलकर्णी इन्स्टाग्राम )

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य