-
शाहरुखचे असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, किंग खानचे असेही अनेक चित्रपट आहेत जे आजपर्यंत प्रदर्शित झालेले नाहीत. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटांबद्दल…
-
‘किसी से दिल लगाके देखो’
या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक कल्पतरू करत होते. चित्रपटाचे शूटिंगही झाले होते, मात्र काही कारणास्तव ते मध्येच थांबवावे लागले. या चित्रपटात शाहरुख खानसोबत आयशा जुल्का आणि मधु मुख्य भूमिकेत होत्या. -
रश्क
शाहरुखच्या इतर प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांच्या यादीत ‘रश्क’ चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २००१ मध्ये सुरू झाले होते. -
यामध्ये किंग खान व्यतिरिक्त जुही चावला आणि बिग बी अमिताभ बच्चन देखील होते. या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झाले होते, मात्र तो प्रदर्शित का झाला नाही हे गुलदस्त्यातच राहिले.
-
अहमक
या यादीमध्ये शाहरुखच्या ‘अहमक’ चित्रपटाचाही समावेश आहे. १९९१ मध्ये मणि कौल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. या चित्रपटात शाहरुखबरोबर अयुब खान आणि मीता वशिष्ठ महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट पूर्ण झाला आहे आणि २०१५ च्या चित्रपट महोत्सवात देखील दाखवला गेला, परंतु तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. -
शिखर
दिग्दर्शक सुभाष घई यांनी ‘परदेस’पूर्वी शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांना आणखी एका चित्रपटासाठी संपर्क साधला होता. या चित्रपटाचे नाव होते ‘शिखर’. किंग खानने सुभाष घई यांना या चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले, पण त्यांनी ते मान्य केले नाही आणि अभिनेत्याने चित्रपट नाकारला. -
यानंतर सुभाष घई यांनी पटकथेत बदल करून चित्रपटाचे नाव ‘ताल’ केले. यामध्ये ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर यांना कास्ट केले गेले. हा चित्रपट सुपरहिट ठरला.
-
एक्स्ट्रीम सिटी
बॉलीवूडशिवाय शाहरुख खान २०११ मध्ये हॉलिवूडकडे वळला होता. शाहरुख ‘एक्सट्रीम सिटी’ नावाचा हॉलिवूड चित्रपट करत होता. प्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन स्कोर्से या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. शाहरुख व्यतिरिक्त या चित्रपटात सुपरहिट चित्रपट टायटॅनिक फेम लिओनार्डो डिकॅप्रियो देखील मुख्य भूमिकेत होता, परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट मध्येच अडकला आणि पुढे कधीच तो प्रदर्शित होऊ शकला नाही. -
आगामी चित्रपट
शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘किंग’, ‘पठाण २’, ‘टायगर वर्सेस पठाण’मध्ये दिसणार आहे. हेही पाहा- Photos : ऑफ शोल्डर वन पीस ड्रेसमध्ये सिझलिंग सई ताम्हणकर, फोटो व्हायरल

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?