-
अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ती ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे.
-
काही दिवसांपूर्वी तेजश्रीने प्रशांत दामले यांचं ‘शिकायला गेलो एक’ नाटक पाहिलं. या नाटकातील कलाकारांचं भरभरून कौतुक करताना तेजश्री दिसली होती.
-
आतादेखील तेजश्री निर्सगाच्या साधिन्यात रमली आहे. याचे फोटो ती इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत आहे.
-
काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने प्रेम, नातं, घटस्फोट, सोशल मीडिया याविषयी परखड मतं मांडली.
-
‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत तेजश्रीला आवडत्या पदार्थाबद्दल विचारलं. तेव्हा अभिनेत्रीने काय उत्तर दिलं? जाणून घ्या…
-
तेजश्री म्हणाली, “मला खाण्यातलं सगळं आवडतं. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही मला खायला खूप आवडतं. मला आता सुद्धा कुठेतरी पाणीपुरी खायची म्हणालीस. तरीही ती मला तेवढीच आवडते.”
-
नंतर तेजश्रीला विचारलं, ‘चहा की कॉफी’ तर तेजश्री म्हणाली की, यापैकी काहीच नाही. आपल्या इंटस्ट्रीत माझ्या आजूबाजूने आजूबाजूच्या लोकांकडे चहा-कॉफी फिरत असते. पण एखादी कीक मिळण्यासाठी पुस्तकं वाचते.
-
पुढे तिला ‘सध्या काय वाचतेस?’ असं विचारलं. तेजश्री म्हणाली, “सध्या मी खूप वेगळं पुस्तक वाचतेय. त्याबद्दल मला सांगायला आवडणार नाही.”
-
सर्व फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम
Pakistan PM Shahbaj Sharif : “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया!