-
विजयच्या तमिळ अॅक्शन चित्रपट ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (GOAT) मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पार्वती नायरने साखरपुडा केला आहे.
-
तिने तिचा होणारा पती आश्रित अशोकसोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
पार्वती नायरचा होणारा पती आश्रित अशोक हा चेन्नईतील एक बिझनेसमन आहे.
-
पार्वती व आश्रित यांनी एका खासगी सोहळ्यात साखरपुडा केला.
-
पार्वतीने होणाऱ्या पतीसोबतचे काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
-
साखरपुड्यात पार्वतीने पेस्टल ग्रीन रंगाची साडी नेसली होती.
-
तर आश्रितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता या खास दिवसासाठी निवडला.
-
साखरपुड्याचे फोटो शेअर करताना पार्वती नायरने आश्रितचं कौतुक केलंय.
-
“प्रत्येक चढ-उतारात, तू माझ्या पाठीशी उभा राहिलास. आणि आज मी आयुष्यभर प्रेम, विश्वास आणि पाठिंबा देण्यास होकार देतेय,” असं पार्वतीने लिहिलं.
-
पार्वती व आश्रित या फोटोंमध्ये खूप छान दिसत आहेत.
-
पार्वतीने काही दिवसांपूर्वी बंगळुरू टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाचे प्लॅन्स सांगितले.
-
“मला वाटतं की ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आयुष्यभर घालवणार आहात त्याला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आश्रित सुरुवातीपासूनच याबद्दल अगदी स्पष्ट होता आणि कालांतराने मला समजलं की तो त्याच्या शब्दावर ठाम आहे,” असं ती म्हणाली.
-
३२ वर्षीय पार्वती नायर आणि आश्रित अशोक यांच्या लग्नापूर्वीचे सेलिब्रेशन ६ फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये सुरू होईल आणि त्यानंतर लग्न होईल. पार्वती आणि आश्रितचे लग्न चेन्नईमध्ये होणार आहे.
-
(सर्व फोटो – पार्वती नायर इन्स्टाग्राम)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”