-
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा तिचा भाऊ सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यासाठी भारतात दाखल झाली आहे.
-
प्रियांकासह तिची लेक मालती मेरी, नवरा निक आणि अभिनेत्रीचे सासू-सासरे सुद्धा भारतात आले आहेत.
-
सिद्धार्थच्या मेहंदी सोहळ्यात जोनास कुटुंबीयांनी एकत्र धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
प्रियांकाच्या सासूबाई गुलाबी रंगाची डिझायनर साडी नेसून या मेहंदी सोहळ्याला आल्या होत्या.
-
यानंतर देसी गर्लच्या सासूबाईंनी हातावर सुंदर अशी मेहंदी काढून घेतली. डेनिस मिलर यांचा ग्लॅमरस अंदाज यावेळी लक्षवेधी ठरला.
-
याशिवाय प्रियांकाची चिमुकली लेक मालती मेरीने सुद्धा मामाच्या मेहंदी सोहळ्यात खास तयार केली होती. सुंदर असा बेबी पिंक रंगाचा लेहेंगा तिने घातला होता.
-
मालती मेरीने सुद्धा आपल्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढून घेतली होती. प्रियांकाने सगळ्या फोटोंमध्ये तिच्या लेकीचा चेहरा ब्लर करून हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
प्रियांकाने या फोटोंना ‘#Sidnee की मेहंदी’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री नीलम उपाध्यायबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. ( फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम )
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच