-
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर खऱ्या आयुष्यात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सहकलाकारांनी नुकतंच दिव्याचं केळवण आयोजित केलं होतं.
-
दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. या दोघांचा तिलक समारंभ १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता.
-
यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला लग्नपत्रिकेची लहानशी झलक सर्वांबरोबर शेअर करत दिव्याने ती लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं.
-
याचनिमित्ताने मालिकेतील सगळ्या कलाकारांनी मिळून दिव्या आणि अक्षयचं केळवण साजरं केलं. केळवणासाठी दिव्याने सुंदर अशी साडी नेसली होती.
-
दिव्याच्या केळवणासाठी अक्षया देवधर व हार्दिक जोशी, मीनाक्षी राठोड, हर्षदा खानविलवकर, तुषार दळवी, निखिल राजेशिर्के, कुणाल शुक्ला, अनुज ठाकरे असे सगळे कलाकार उपस्थित होते.
-
दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे.
-
दिव्याने तिच्या लग्नाची तारीख अद्याप सोशल मीडियावर रिव्हिल केलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत ती विवाहबंधनात अडकेल असं बोललं जात आहे.
-
दरम्यान, दिव्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर यापूर्वी तिने ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती साकारत असलेल्या ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीच्या पात्राला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ( फोटो सौजन्य : दिव्या पुगावकर इन्स्टाग्राम )

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!