-
सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
टीआरपीमध्ये ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने ‘ठरलं तर मग’ला मागे टाकून अव्वल स्थान मिळवलं आहे.
-
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कला आणि अद्वैतची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
-
अभिनेत्री ईशा केसकरने कला ही भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे. त्यामुळेच आता ईशाला कला म्हणून अधिक ओळखू लागले आहेत.
-
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून सध्या मनोरंजन करणाऱ्या ईशा केसकरच्या तुम्हाला काही आवडी-निवडी माहितीये का? तर जाणून घ्या…
-
नुकताच ईशा केसकरने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी तिने आवडता पदार्थ, नावडता पदार्थ, आवडता रंग, अभिनेता याविषयी सांगितलं.
-
ईशा केसकरचा आवडता पदार्थ तिरामिसू आहे. तर नावडता पदार्थ चहा आहे.
-
तसंच ईशाचा आवडता रंग काळा असून तिचा आवडता अभिनेता सुपरस्टार शाहरुख खान आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – ग्राफिक्स टीम आणि ईशा केसकर इन्स्टाग्राम
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”