-
रणवीर अलाहाबादियाची सध्या गुगलवर टॉप ट्रेंडिंग सर्चमध्ये आहे. युट्यूबर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) या शोमध्ये अश्लील कमेंट्स केल्यानंतर रणवीरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर लाखो लोक रणवीरला फॉलो करतात.
-
वादग्रस्त टिप्पणीवरून झालेल्या गोंधळानंतर आणि त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीनंतर, रणवीरने एक व्हिडिओ पोस्ट करून माफीही मागितली आहे.
-
रणवीर त्याच्या पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करतो आणि त्यांच्या मुलाखती घेतो. सोशल मीडियावर प्रचंड चाहते असलेल्या रणवीरला पंतप्रधान मोदींनी National Creators Award 2024 पुरस्कारही प्रदान केला.
-
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने वयाच्या २२ व्या वर्षी त्याचे पहिले युट्यूब चॅनल बीअरबायसेप्स सुरू केले.
-
आज आम्ही तुम्हाला ७ यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्या रणवीर अलाहाबादियाच्या एका दिवसाच्या कमाईबद्दल सांगणार आहोत…
-
बियरबायसेप्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या रणवीरचे सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल, बियरबायसेप्स आहे. रणवीरचे एकूण ७ यूट्यूब चॅनेलवर १.२ कोटींहून अधिक सबस्क्राइबर आहेत.
-
Koimoi.com नुसार, रणवीर इलाहाबादियाचे मासिक उत्पन्न ३५ लाख रुपये आहे.
-
म्हणजेच २४ तासांत दररोज रणवीर एकूण १.१६ लाख रुपये कमावतो.
-
रणवीर ब्रँड एंडोर्समेंट, रॉयल्टी आणि लाईव्ह प्रमोशनमधूनही भरपूर कमाई करतो.
-
रिपोर्ट्सनुसार, रणवीर इलाहाबादियाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. २०२४ मध्ये त्याची एकूण संपत्ती सुमारे ६० कोटी रुपये होती. हेही पाहा- Eternal असे नामांतर केलेल्या Zomato या फूडटेक कंपनीचा प्रवास कसा राहिलाय? जाणून घ्या…
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”