-
‘छावा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र दिलं आहे. त्याच निमित्ताने भारतातील चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांचा काय अर्थ असतो? त्याचे किती प्रकार असतात? याबद्दल जाणून घेऊयात. (Photo: Loksatta Graphics Team)
-
दरवर्षी आपल्याकडे शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती यांसह अनेक चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात सहज पाहायला मिळतात. (Photo: Pexels)
-
यातील काही चित्रपट हे सुपरहिट ठरतात, तर काही मात्र फ्लॉप. पण या सर्व चित्रपटात एक गोष्ट कायम असते आणि ते म्हणजे सेन्सॉर प्रमाणपत्र. (Photo: Pexels)
-
हे प्रमाणपत्र काही सेकंदासाठी स्क्रीनवर झळकते. पण सेन्सॉर प्रमाणपत्र हे चित्रपटासाठी फार महत्त्वाचे असते. जर हे प्रमाणपत्र नसेल तर कोणताही भारतीय चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकत नाही. (Photo: Pexels)
-
सेन्सॉर बोर्ड काय आहे?
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सीबीएफसी एक सरकारी मान्यताप्राप्त संस्था आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातंर्गत या संस्थेचे काम चालते. ही संस्था देशातील विविध चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याचे काम करते. सिनेमॅटोग्राफी अॅक्ट १९५२ मधील तरतुदींनुसार चित्रपटाच्या प्रदर्शनसाठी एक विशिष्ट प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र याच संस्थेमार्फत दिले जाते. भारतातील कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी किंवा तो प्रदर्शित होण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी लागते. (Photo: Social Media) -
एखादा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे आल्यानंतर त्याला परवानगी द्यायची की नाही, यासाठी तीन पॅनलमध्ये विभागणी केली जाते. पहिल्या पॅनलमध्ये चौकशी समिती असते. दुसऱ्या पॅनेलला फेरविचार समिती म्हणतात. या तिसऱ्या पॅनेलमध्ये सिनेक्षेत्रातील नामवंत आणि अनुभवी व्यक्ती सदस्य म्हणून असतात. (Photo: Indian Express)
-
दरम्यान जर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्यासाठी उशीर झाला किंवा नकार मिळाला तर त्यानंतर निर्माते हे कोर्टाचे दार ठोठवू शकतात. कोणत्याही चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुमारे एक महिन्याचा वेळ लागू शकतो. (Photo: Pexels)
-
सेन्सॉर प्रमाणपत्रांचे प्रकार
सेन्सॉर बोर्ड कोणत्याही चित्रपटाला चारपैकी एक प्रमाणपत्र देतं. या चारही प्रकारांचे अर्थ वेगवेगळे आहेत.
१.यूनिव्हर्सल (U) : कोणत्याही वर्गातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात.
२.यूनिव्हर्सल अॅडल्ट (U/A) : १२ वर्षांखालील मुलं आपले आई-वडील किंवा कुणी वयाने मोठे असलेल्या व्यक्तीसोबतच हा चित्रपट पाहू शकतात. (Photo: Social Media) -
३.अॅडल्ट (A) : एखादी १८ वर्षांवरील व्यक्तीच हा चित्रपट पाहू शकते.
४.स्पेशल (S) : डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी इत्यादी अशा खास वर्गच हा चित्रपट पाहू शकते. (Photo: Pexels) हेही पाहा- Photos : वजन वाढवलं, घोडेस्वारी शिकला; छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने कशी केली तयारी?
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”