-
सैराट चित्रपटातील अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. (सर्व फोटो-रिंकू राजगुरु, इन्स्टाग्राम पेज)
-
रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
रिंकू राजगुरुला सैराट सिनेमाने घराघरात पोहचवलं. आता चर्चा होते आहे तिच्या कृष्णराज महाडीक यांच्याबरोबरच्या फोटोची.
-
रिंकू सोशल मीडियावर कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
रिंकूने आत्तापर्यंत सैराटसह विविध चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. तिने तिचा एक चाहता वर्ग तयार केला आहे.
-
रिंकूच्या आयुष्यात काय चाललं आहे याची उत्सुकता अनेकांना असते.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकू कायमच तिच्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते किंवा व्हिडीओही पोस्ट करत असते.
-
कृष्णराज महाडिक यांनी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू राजगुरू दिसत होती. या फोटो त्यांनी खास कॅप्शन दिले होते. “आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले,” असे कृष्णराज महाडिक यांनी म्हटलं होतं. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. (फोटो कृष्णराज महाडीक, इन्स्टाग्राम पेज)
-
रिंकूचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर विविध चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. पण तिने याबाबत अधिकृत रित्या काहीही सांगितलेलं नाही.
-
इतकंच नाही तर आता रिंकूच्या स्टेटसचीही चर्चा रंगली आहे. या फोटोत रिंकूच्या कपाळावर तसंच कुंकू दिसतं आहे जे कृष्णराज महाडीक यांच्यासह असलेल्या फोटोत होतं, शिवाय ड्रेसही तोच आहे. त्यामुळे आता रिंकूच्या या स्टेटसचीही चर्चा रंगली आहे.
-
सैराटमुळे घराघरांत पोहचलेली रिंकू आता तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. तसंच आता स्टेटसचीही चर्चा रंगली आहे हे विशेष.
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य