-
‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमातून लोकप्रिय झालेला विकी कौशल सध्या खूप चर्चेत आहे. (Photo: Indian Express)
-
त्यामागील कारण म्हणजे त्याचा नवा बिग बजेट ‘छावा’ हा चित्रपट. (Still From Trailer)
-
या चित्रपटात तो नॅशनल क्रश रश्मिका मंदानाबरोबर दिसणार आहे. (Still From Trailer)
-
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित हा चित्रपट त्याच्या करिअरमधला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, असा अंदाज चित्रपट समिक्षक वर्तवत आहेत. (Still From Trailer)
-
दरम्यान, उरी, सॅम बहादूर, डंकी अशा अनेक चित्रपटांमधील उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विकी चित्रपटांसाठी किती मानधन घेतो याबद्दल जाणून घेऊयात. (Photo: Vicky Kaushal/Instagram)
-
सॅम बहादुर
माध्यमांतील माहितीनुसार विकीने सॅम बहादुरसाठी १० कोटी रुपये मानधन घेतलं होतं. या चित्रपटात त्याने भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ यांचं पात्र साकारलं होतं. (Photo: Indian Express) -
वाढवले मानधन
मसान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विकीने सॅम बहादूरनंतर त्याचे मानधन २० कोटींवर नेल्याचे काही वेबपोर्टल्सवरील रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. (Photo: Indian Express) -
डंकी
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकीमध्ये विकीने छोटीशी पण महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. रिपोर्टनुसार यासाठी त्याला १२ कोटी रूपये मिळाले होते. (Photo: Indian Express) -
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटासाठी विकीने किती पैसे आकारले हे अद्याप कळू शकलेलं नाही. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. (Still From Trailer)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”