-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री पूर्वा कौशिक यांची प्रमुख भूमिका असलेली ‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.
-
‘शिवा’ मालिकेत झळकलेला एक अभिनेता आता ‘विठ्ठला’च्या रुपात पाहायला मिळणार आहे.
-
‘सन मराठी’ वाहिनीवर ‘सखा माझा पांडुरंग’ नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
‘सखा माझा पांडुरंग’ या नव्या मालिकेत संत सखूची अवीट भक्तीगाथा पाहायला मिळणार आहे.
-
१० जानेवारीपासून ‘सखा माझा पांडुरंग’ मालिका सोमवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे.
-
‘सन मराठी’ वाहिनीवरील या नव्या मालिकेत ‘शिवा’मधील चंदन म्हणजे अभिनेता तेजस महाजन ‘विठ्ठला’च्या रुपात पाहायला मिळणार आहे.
-
‘सखा माझा पांडुरंग’ या नव्या मालिकेत तेजस व्यतिरिक्त बालकलाकार स्वराली खोमणे आणि सुनील तावडे असे बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत
-
फोटो सौजन्य – सन मराठी, सोशल मिडिया, ग्राफिक्स टीम
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”