-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले नेहमी चर्चेत असते.
-
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यापासून रुपाली वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून रुपाली देवदर्शन करताना दिसत आहे.
-
अलीकडेच तिने एकवीरा देवी आणि तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं.
-
त्यानंतर आता रुपालीने कुटुंबासह विठ्ठलाचं दर्शन घेतलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये रुपाली आई-वडील आणि भावाबरोबर पाहायला मिळत आहे.
-
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचे फोटो शेअर करत रुपालीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मायबापा विठ्ठला”
-
देवदर्शनाचे रुपाली भोसलेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य – रुपाली भोसले इन्स्टाग्राम
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”